दांत सफेद करून घेण्याचे पांच उपाय ...

source 
सफेद निरोगी हास्य कुणाला नको असते , ते आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवायला ,चांगलं दिसायला मदत करते. तुमच्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने एकदा तरी आपले दांत सफेद दिसण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेले विविध उपाय अवलंबले असतील किंबहुना आपल्या दंतचिकित्सकालाही त्यासंबंधित विचारलं असावं

जेव्हा या लेखात मी दात सफेद करण्याविषयी बोलत आहे तेव्हा असे समजू नका कि मी काही तुम्हाला दांत सफेद करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहे .. नाही !
जेव्हा पण आपण घरगुती उपायांबद्दल पहातो तेव्हा त्याला काही पुरावा नसतो, उलट बेकिंग सोडा किंवा लिंबू असे प्रकारचे पदार्थ तुमचे दांत सफेद करण्यापेक्षा तुमच्या दातांचे नुकसान करण्याला जास्त कारणीभूत ठरतात.
मग हे बाकीचे प्रभावी उपाय कोणते ?

१. डेंटल क्लिनिंग


source 
डेंटिस्ट कडून दांत स्वच्छ करून घेण्याला डेंटल क्लिनिंग किंवा डेंटल स्केलिंग  (oral prophylaxis) असे बोलले जाते . ज्यामुळे आपल्या दाताच्या पृष्ठभागावरील डाग (plaque) स्वच्छ व्हायला मदत होते. स्केलिंग नंतर पॉलिशिंग केल्यामुळे दाताचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो आणि अशा पृष्ठभागावर डाग साचत नाहीत .

२. होम ब्लीचिंग

source 
होम ब्लिचिंग मध्ये तुम्ही स्वतःहून घरच्या घरी दांत सफेद करून घेऊ शकता . ह्यामध्ये तुमचा डेंटिस्ट तुम्हाला एक स्पेसिअल ट्रे (साचा) बनवून देतो ज्यामध्ये ब्लिचिंग जेल चा वापर करून तुम्ही हवे त्या प्रमाणे दांत सफेद करून घेऊ शकता.
हा स्पेशल ट्रे तुम्ही दांत सफेद करण्यासाठी वापरू शकता , जवळ जवळ २ ते ४ आठवड्यात दांत सफेद होतात, काही काही जेल ८ तासांपर्यंत दातांवर ठेऊ शकतो ज्यामुळे एका आठवड्यातच दांत सफेद दिसायला लागतात.

३. इन् ऑफिस ब्लीचिंग


source 
लेझर व्हाइटनिंग, ज्याला पॉवर व्हाइटनिंग असेही म्हटले जाते, हा एक दांत सफेद करायचा दुसरा प्रकार.
जर का तुम्हाला  २ ते ४ आठवड्याचा कालावधी जास्त वाटत असेल तर इन ऑफिस ब्लीच हा एक उत्तम उपाय आहे ज्याला फक्त एक तास लागतो आणि तुमचा डेंटिस्ट ते तुम्हाला क्लिनिक मधेच करून देतो.
या ट्रीटमेंट मध्ये तुमचे डेंटिस्ट तुमच्या दातांवर ब्लिचिंग जेल लावून ते लेसर ने ऍक्टिव्हेट करतात तसेच जेलमध्ये असलेले ब्लिचिंग एजन्टचे प्रमाण या पर्यायात जास्त असते.

४. दातांची स्वछता पाळणे व नियमित ब्रशिंग


source 
ह्यात काही नवे नाही कि सफेद दातांसाठी आपल्याला नियमित दांत स्वच्छ करणे आवश्यक असते.
हे दाताला कसे स्वच्छ ठेवावे हे या लेखात वाचा : दातांचे स्वास्थ्य कसे ठेवाल 

५. योग्य आहार 


source 

काही पदार्थ तुमचे दांत पिवळे करण्यासाठी कारणीभूत ठरतात. दारु आणि धूम्रपानाची सवय,कोल्ड्रींक्सच्या सेवनाने दात पिवळे पडतात.या पदार्थांचे सेवन न करणे ही तेवढेच आवश्यक आहे. 

अधिक जाणून घ्या: या ५ पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे दांत पिवळे होऊ शकतात 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दांत काढून झाल्यानंतर या पांच गोष्टी करू नयेत ....

दांत काढल्यानंतर काय खावे व काय खाऊ नये ?

दातांचा इलाज एवढा महाग कसा?