आपण दिवसभरात किती पदार्थांचे सेवन करत असतो यातील काही पदार्थ आपल्या दातांचा सफ़ेद रंग बदलण्यासाठी कारणीभूत असतात. हे असे कोणते पदार्थ आहेत ते पाहु.
१. चहा - कॉफी
सकाळी संध्याकाळी आपण रोजच चहा पीतो, प्रत्येक वेळी चाहा कॉफ़ी प्यायल्यावर चूळ भरणे आवश्यक असते. कॉफीमधील टॅनिन हा घटक आपल्या दाताच्या वरच्या आवरणाला नुकसान पोहोचवतो ज्यामुळे आम्ले दीर्घकाळ आपल्या दातांवर टिकून राहतात व दाताचे नुकसान करतात
२. भारतीय जेवण
भारतीय जेवणात हळद आणि मसाला भरपूर प्रमाणात असतों ज्याचा नक्कीच आपले दात पिवळे होण्यामध्ये सहभाग असतो.
3. विशिष्ट प्रकारची फळे
रास्पबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी मधील गडद रंग, जाम किंवा जेली किंवा रस म्हणून खाल्ले तरी आपल्या दातांच्या सफेद रंगाला बदलू शकतात.
४. लिंबूवर्गीय फळे (Citrus फ्रुटस)
संत्री ,मोसंबी ,टोमॅटो आणि लिंबू यांच्यासारख्या फळांच्या आम्लयुक्त स्वभावामुळे ते आपल्या दातांमधील पहिल्या सफेद आवरणामधील (एनॅमलमधील ) छिद्र उघडण्यास प्रवृत्त करतात ज्यामध्ये डेन्टीन हे दुसरे आवरण ज्याचा रंग पिवळा असतो ते दिसू लागते. त्यामध्ये ही पिझ्झा सॉस किंवा स्पेगेटी सॉस देखील आपल्या दातांना पिवळे करण्यास मदत करते.
5. रेड वाइन किंवा व्हाईट वाइन
यामुळे दात करड्या रंगात बदलू शकतात. हे राखाडी डाग पिवळ्या डागांपेक्षा जास्त तीव्र असतो.
यापैकी काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर नेहमीच आपले तोंड किंवा ब्रश स्वच्छ धुवा आणि आपल्या दंतचिकित्सकास नियमित भेट द्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा