दांत काढल्यानंतर काय खावे व काय खाऊ नये ?
source |
तुम्ही हे वाचताय म्हणजे तुम्ही दांत काढून घेतलात किंवा घेणार ही असाल ! अर्थात मी तुम्हाला काही 'मिसळ पावा'वर ताव मारायला सांगणार नाही ना ही लगेच तुम्ही धाडस करून 'वडा पाव' खायला जाणार आहात ..🙊
ठीक आहे ,अजून चवदार गोष्टींची नावं नको घ्यायला ...
कारण जर तुम्ही खरंच दांत काढून घेताय किंवा काढायला जाणार आहेत तर तुम्हाला काही दिवस डाळ भातावरच काढावे लागू शकतात.
SOURCE |
दांत काढून झाल्यावर त्या दिवशी :
मसालेदार,कठीण आणि गरम खाद्यपदार्थ खाणे टाळावे ..पॉपकॉर्न किंवा पापड सारखे कुरकुरीत पदार्थ टाळावेत
बीज असलेले किंवा जीरा ,मोहरी ,तीळ असे पदार्थ खाणे टाळावे कारण हे सहसा जखमेमध्ये जाऊन बसतात आणि स्वच्छ होत नाही. ज्यामुळे यामुळे पुढे जाऊन जखमेमध्ये ते अडकून आणखीनच त्रास होऊ शकतो.
विशेषतः चहाप्रेमींनी त्यांचा आवडता गरमागरम चहा पिणे टाळावे.
चला तर आपण मुद्द्याचं बोलू .
दात काढल्यानंतर काही दिवस आपण काय खाऊ शकता ..
१. मलईदार सूप किंवा कढी
SOURCE |
फक्त लक्षात ठेवा सूप, कढी अथवा डाळ पिताना जास्त गरम असू नये ती थोडी कोमट करून प्यावी.
२. दही (Yogurt)
दही आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवायला मदत करते आणि त्याने आपले पचन ही सुधारते.
SOURCE |
३. उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट
अंड्याचे शरीराला होणारे फायदे नवीन नाहीत . अंड्यामधून आपल्याला प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळते.source |
४. डाळ भात किंवा खिचडी
source |
५. स्मूदीज ,ज्यूस किंवा मिल्कशेक्स
ऊस ,मोसंबी कोणत्याही फळाचा रस अथवा आजकाल मुलांना मिल्कशेक व स्मूथी प्यायला भरपूर आवडतात. हे सहसा थंड असल्यामुळे तुम्ही पिऊ शकता . मात्र लक्षात ठेवा कोणताही प्रकारचा रस पिताना स्ट्रॉ चा वापर बिलकुल करू नये तर तो ग्लासातूनच प्यावा .source |
६. आईस्क्रीम
दांत काढण्याच्या एक तासानंतरच डेंटिस्ट तुम्हाला आईसक्रीम खायचा सल्ला देतात . आईसक्रीम थंड असल्यामुळे ते रक्तस्त्राव कमी करते व जखम भरायला मदत करते.source |
मला खात्री आहे की हे सर्व पाहून तुम्हाला भुक लागली असेल..
माझ्या अनुभवानुसार तर काही लहान मुल दांत काढायचा म्हटल्यावर आईसक्रीम खायला मिळेल म्हणून चक्क खूष होतात 😅
तुम्ही तर त्यातले नाही ना ? 😁
source |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा