दांत काढून झाल्यानंतर या पांच गोष्टी करू नयेत ....
source |
हा लेख वाचायला आलात म्हणजे तुम्ही कदाचित दांत काढून घेतला असेल किंवा काढायला जाणार असाल .. दांत काढण्याची कारणे बरीच असू शकतात , तुमचा दांत हलत असेल, जास्त किडला असू शकेल किंवा तुमच्या अक्कलदाढेला काढण्यासाठी तुमच्या डेंटिस्ट ने सल्ला दिला असेल...
दांत काढण्याची प्रक्रिया झाल्यावर जी काही काळजी घ्यावयाची असते ते पूर्णपणे आपल्यावर असते..
आणि म्हणूनच दांत काढून झाल्यावर कोणती खबरदारी घ्यावी हे आपणास माहित असणे आवश्यक आहे.
दांत काढून झाल्यानंतर तुमच्या दंतचिकित्सकाने तुम्हाला कमीतकमी अर्धा ते एक तासासाठी जखमेवर कापूस दाबून ठेवायला सांगितले असेल, जे दात काढल्यानंतर रक्तस्त्राव नियंत्रित करण्यात मदत करेल.
दात काढून झाल्यानंतर एक तासानंतर दही किंवा प्लेन आइस्क्रीम सारखे काहीतरी थंड खावे ज्यामुळे रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते.
काय काय करणे टाळावे ?
- दांत काढून झाल्यावर बाहेर थुंकणे किंवा पाण्याने चूळ भरणे टाळावे.
- कमीतकमी २४ तासांसाठी कडक ,गरम आणि मसालेदार अन्नपदार्थ आणि पेय टाळा.
- दांत काढलेल्या दिवशी ब्रश करू नका .
- धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन टाळा कारण यामुळे बरे होण्याच्या प्रक्रियेस बाधा येईल.
- ज्यूस किंवा थंड पेय पिताना स्ट्रॉचा वापर करणे टाळा.
ज्या बाजूला दांत काढला आहे तेथे बाहेरून बर्फाचा शेक द्यावा.
२४ तासांनंतर,
दिवसातून तीन वेळा कोमट पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून हळुवारपणे चूळ भरावी.
कमीतकमी २४ तास मऊ आणि द्रवयुक्त आहार घ्या.
डेंटिस्ट ने सांगितल्यानुसार औषधे घेणे सुरू ठेवा.
तोंडातील जखम भरण्यास कमीत कमी ७ ते २० दिवस लागू शकतात. ह्या संपूर्ण काळात आपल्याला जखम स्वच्छ ठेवणे महत्वाचे असते. ज्यासाठी कोमट पाण्याने चूळ भरावी व हळुवारपणे ब्रश करावे .
वेदना कायम राहिल्यास आपण आवश्यक असलेल्या पाठपुराव्यासाठी दंतचिकित्सकाकडे नेहमी संपर्क साधू शकता.
जर आपल्याला दात काढल्यानंतर आपण काय खावे याबद्दल शंका असल्यास पुढील लेख वाचा : दांत काढल्यानंतर काय खावे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा