दर दिवशी ब्रश करुनही दाताला कीड लागत आहे ?

SOURCE

दररोज दोनदा ब्रश करूनही तुम्हाला दातांना कीड लागत आहे का ?  ह्याचे मुख्य  कारण म्हणजे आपल्याला ब्रश करण्याची योग्य पद्धतच माहित नाही!

दिवसातून किती वेळा दांत घासवेत ?
किती वेळ दांत घासवेत ?

तुमच्यापैकी बहुतेक जणांना माहितही असेल की  दिवसातून दोनदा, सामान्यत: सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचा सल्ला डेंटिस्ट देतात. पण ब्रश करताना प्रत्येक वेळी आपण  आपल्या दातांची  आतील, बाह्य आणि चावण्याची वरची बाजू साफ होणे आवश्यक असते.

आपण आकृतीच्या सहाय्याने दातांच्या सर्व बाजू जिथे आपले ब्रश फिरणे आवश्यक आहे त्या  बाजू समजून घेऊ !





आपल्याला दाताच्या या सर्व पृष्ठभागावर ब्रश फिरवणे आवश्यक असते।

याबरोबरच आपला टूथब्रश कधीही आपण आडव्या किव्वा उभ्या दिशेने फिरवू नये तर तो नेहमी वर्तुळामधे फिरवावा




आपण आपला ब्रश पूर्णपणे दातांवर ठेऊन ब्रश करतो जे चुकीचे आहे. आपला ब्रश नेहमी दांत आणि आपल्या हिरडया यांच्या बॉर्डर वर ठेऊन हळुवार पणे वर्तुळाकार दिशेने फिरवावा. दातान्सोबत आपल्याला आपली जीभ सुद्धा साफ़ करणे तितकेच महत्वाचे आहे.
जीभ साफ़ करण्यासाठी आपण आपला ब्रश जीभेच्या मागील बाजूने पुढील टोकापर्यंत हळुवारपणे फिरवू शकता.  .

जर  आपल्याला या पद्धतीचा सराव झाला  तर  आपले दात पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी 2 मिनिटांपेक्षा जास्त अवधी लागणार नाही.

हॅप्पी ब्रशिंग !! 😊👍

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दांत काढून झाल्यानंतर या पांच गोष्टी करू नयेत ....

दांत काढल्यानंतर काय खावे व काय खाऊ नये ?

दातांचा इलाज एवढा महाग कसा?