कोरोनाच्या काळात तुमच्या डेंटिस्टला भेट देताय ? काय खबरदारी घ्याल..
source कोरोना विषाणूची साथ यामुळे भविष्यातील अनिश्चितता आणि अनिश्चिततेसह सर्व जगावर आर्थिक,सामाजिक आणि मानसिक पातळीवर परिणाम होताना दिसत आहेत. भारतामध्ये अनलॉक करायची प्रक्रिया सुरु झाल्यापासून,देशात विशेषतः शहरी भागात कोरोनाचा संसर्ग आणखीच वाढत चाललेला आहे.इतक्या दिवसांपासून राज्यात खूप काही बंद होते त्यामध्ये ' दातांचे दवाखाने ' ही! आता डेंटिस्टनीही आप-आपले दवाखाने चालू करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपला दांत दुखत असेल किंवा काही त्रास झाला तर आपण डेंटिस्टला सहजपणे भेट देत असू पण आतामात्र कॉरोनाच्या प्रादुर्भावानंतर ते पहिल्यासारखे शक्य होईल का? ... source आपण उदाहरणार्थ श्री.पाटील यांचा विचार करूया. श्री.पाटील यांच्या दाढेमध्ये एक पोकळी होती ,जी आता दुखू लागली, वेदना कमी करण्यासाठी स्वत:हुंन दांत दुखण्याचे औषधे घेतल्यानंतरही त्यांना बरे होत नसल्याने आता डेंटिस्ट कडे जाणे त्यांना गरजेचे झाले. कोरोना महामारीच्या काळात डेंटिस्ट कडे जाण्याअगोदर त्यांना काही शंका आहेत ... कोरोनाच्या काळात द...