अक्कलदाढ काढण्याअगोदर विचारले जाणारे ६ प्रश्न !
source |
जर का तुम्ही तुमची अक्कलदाढ काढून घेणार असाल किंवा बहुतेक तुम्हाला तुमच्या डेंटिस्ट ने अक्कलदाढ काढून घ्यायचा सल्ला दिला असेल ..
तर मग तुम्हाला यातले काही प्रश्न नक्कीच असतील ...
अक्कलदांत काढण्याअगोदर विचारले जाणारे बहुतेक प्रश्न व त्यांची उत्तरे :
१. एकाच बैठकीत एकापेक्षा जास्त अक्कलदांत काढून घेणे ठीक आहे काय?
उत्तर: होय आपण एकाच दिवशी एकापेक्षा जास्त अक्कलदांत काढून घेऊ शकतो.
२. अक्कलदांत काढण्याच्या प्रक्रियेसाठी किती वेळ लागेल?
उत्तर.हे पूर्णपणे त्या केसवर अवलंबून असते. काही प्रकरणांमध्ये 10 मिनिटे लागू शकतात किंवा काहींना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
३. दात काढून टाकल्यानंतर मी सामान्यपणे खाऊ शकतो?
उत्तर. दांत काढल्यानंतर तुम्ही त्या दिवशी पातळ पदार्थ खाणे गरजेचे असते . विशेषतः त्या दिवशी तुम्ही तिखट,गरम आणि कडक पदार्थ खाणे टाळावे. दुसऱ्या दिवसापासून तुम्ही साधे जेवण घेऊ शकता.
\
वाचा: दांत काढल्यास काय खावे काय खाऊ नये.
४. मी माझे दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करू शकतो ? दात काढण्यासाठीच्या प्रक्रियेनंतर मी कामावर जाऊ शकतो?
उत्तर. दांत काढल्यानंतर कमीत कमी एक दिवस आराम करावा व तुमच्या डेंटिस्ट ने सांगितलेल्या सगळ्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात.
५.अक्कलदाढ काढणे प्रक्रियेदरम्यान किंवा नंतर वेदनादायक आहे?
उत्तर. कोणतेही दंत उपचार वेदनादायक नसतात आणि बहुतेक उपचार भूल (लोकल ऍनेस्थेशिया)देऊन केले जातात. अक्क्कलदात काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे वेदनारहित आहे. तुम्हाला थोडीशी अस्वस्थता जाणवेल पण वेदना होणार नाही.
प्रक्रियेनंतर दंतचिकित्सक आपल्याला वेदना किंवा सूज दूर करण्यासाठी आवश्यक औषधे लिहून देतात.
६. उपचारानंतर सूज येईल का?
उत्तर. जर तुमचा दांत सर्जिकल पद्धतीने काढला असेल तर त्या बाजूला थोडी सूज येऊ शकते पण ती सूज २-३ दिवसांत कमी होते. सूज आली असेल तर तुम्ही तिथे दहा -दहा मिनिटांमधे बर्फाचा शेक देऊ शकता व दिवसातून तीन वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या करू शकता. ज्यामुळे सुजेला आराम मिळेल.
सौर्स |
आपल्या बुद्धिमत्तेवर आपल्यालाच काम करायचे आहे याचा अंदाज घ्या! 😆😜
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा