तुमचे दंतचिकित्सक अक्कलदांत काढण्याचा सल्ला का देत आहेत ?
source |
सहसा आपली अक्कलदांढ १७ ते २५ या वयोगटात येते व हा आपल्याला येणारा सगळ्यात शेवटचा दांत असतो. आजकाल काही लोकांमध्ये तर अक्कलदांत येत सुद्धा नाहीत तर काही लोकांमध्ये अक्कलदांढ पूर्णपणे येते.
बहुतेकदा तुम्हाला माहीतही नसते कि तुम्हाला अक्कलदाढेला कीड लागली आहे ते ... जेव्हा तिच्यामध्ये दुखायला लागते तेव्हा आपल्याला कळते ... पण तोपर्यंत खूप वेळ झालेला असतो. अशी ही किडलेली किंवा अर्धवट तोंडात आलेली अक्कलदाढ वाचवण्यापॆक्षा बहुत्यांदा काढूनच टाका असा सल्ला डेंटिस्ट देतात..
source |
अर्धवट आलेली अक्कलदाढ़ बहुतेकदा पुढच्या त्रासांना निमंत्रण देते.
कसे ते पुढे पाहू ...
जर अक्कलदांत काढून टाकला नाही तर काय होईल?
वेदना
↓
दाढेभोवती हिरड्यांमध्ये अन्नकण अडकणे
↓
संसर्ग किंवा हिरड्यांचा रोग (Gingivitis)
↓
अर्धवट आलेली अक्कलदाढ किडणे
↓
पुढच्या दाढेला आणि आजूबाजूच्या हाडांला नुकसान
↓
अक्कलदांताभोवती द्रव भरलेल्या पिशवी (गळू) चा विकास (Dentigerous cyst)
पण आजकाल बहुतेक मुलांमध्ये अक्कलदाढ अर्धवट का येत आहे?
आपल्या जबड्यामध्ये अक्कलदाढीला यायला जागा का राहिली नाही?
तुम्हाला माहित आहे का आपली 'मानवी उत्क्रांती' हे आपला जबडा लहान होण्यामागचे एक कारण आहे.
कसे काय?
हे जर का जाणून घ्यावयाचे असेल तर आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल ...आपले पूर्वज आत्ता आपण खातो तसे ब्रेड किंवा शिजवलेले पदार्थ खात नसत त्यामुळे त्यांचा जबडा अधिक मजबूत व मोठा होता . त्यावेळी अक्कलदाढेची अन्न चावायला मदत होत होती. मात्र आता आपण प्रोसेसज्ड अन्नपदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करू लागलो आहोत. त्यामुळे आपला जबडा लहान होतो आहे व अक्कलदाढ आता आपण तशी फारशी अन्न चघळण्यासाठी वापरत नाही आहोत.
source |
ही सर्व गुंतागुंत टाळण्यासाठी अक्कलदांत काढून टाकले जातात ...
अक्कलदांत काढण्याची प्रक्रिया सामान्य दाताच्या दवाखान्यात केली जाऊ शकते. तुम्हाला काही अधिक प्रश्न असतील तर तुम्ही हा लेख हे वाचू शकता: अक्कलदाढ काढण्याअगोदर विचारले जाणारे ६ प्रश्न..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा