दात सफेद करण्यासाठी खरोखर बेकिंग सोडा वापरू शकतो ?

sources 

आपण दांत सफेद करण्यासाठी खरंच किती नवीन नवीन गोष्टी वापरून बघतो, नाही का..? कधी ऑइल पुल्लिंग कधी व्हाईटनिंग टूथपेस्ट , कधी व्हिनेगर आणि इंटरनेट वर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तो बेकिंग सोडा ! 

सगळ्यात पहिल्यांदा दांत सफेद करण्यासाठी सांगितले जाणाऱ्या पर्यायांमध्ये बेकिंग सोडा किंवा मीठ हे पदार्थ असतातचं !
काय आहे हा बेकिंग सोडा आणि खरोखरच ह्याने आपले दांत सफेद होतात का ...
चला पाहू...


बेकिंग सोडा म्हणजे काय?


बेकिंग सोडा कुठे वापरला जातो हे तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे ...
बेकिंग सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेट हे एक रासायनिक कंपाऊंड असते जे पांढरे, स्फटिकासारखे असते आणि बर्‍याचदा बारीक पावडर स्वरूपात असते . हे सोडियम आणि बायकार्बोनेट आयनपासून बनलेले असते. . हे स्वभावात अल्कधर्मी असते  म्हणूनच ते आपल्या तोंडातील आम्लीय वातावरण निष्प्रभावी करण्यास मदत करते.



हे खरोखर माझे दात पांढरे करू शकते?


source 

बेकिंग सोडा एक सौम्य अपघर्षक पदार्थ (abrasive agent) आहे, तो आपल्या दातांच्या पृष्ठभागावरील डाग काढून टाकते. हे केवळ प्लाक, चहा किंवा कॉफीचे डाग काढून टाकण्यास प्रभावी आहे परंतु अंतर्गत डाग काढू शकत नाही .


बेकिंग सोडा कसा वापरावा?

 बेकिंग सोड्याने सारखे  दात स्क्रब केल्याने दात खराब होऊ शकतात त्यामुळे तो काळजीपूर्वक वापरावा. आठवड्यातून काही वेळाच बेकिंग सोडाने दात घासण्याचा सल्ला दिला जातो. आणि जेव्हा आपण हे दात घासण्यासाठी वापरता तेव्हा त्यास दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ आपल्या दातांवर राहू देऊ नका.

आपण हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे!
"अतिशयोक्ती ने केलेली  प्रत्येक गोष्ट हानिकारक असू शकते."



दररोज शुद्ध बेकिंग सोडा वापरल्याने दातांवरील थरांमध्ये किंचित मायक्रो-फ्रॅक्चर्स आणि स्क्रॅच होऊ शकतात ज्यामुळे दातांची रचना कमकुवत होऊ शकते. तसेच दातांच्या वरच्या आवरणावर छेद पडल्याकारणामुळे दांत अधिक संवेदनाक्षम होतो आणि काळाच्या ओघात दांत  अधिक पिवळे आणि ठिसूळ होण्याची शक्यता वाढते.



शिवाय, बेकिंग सोडा तोंडा -संबंधित मुद्द्यांवरील तात्पुरते उपाय म्हणून काम करू शकतो, तथापि, जर आपले ध्येय अधिक खोल, जुने डाग काढून टाकण्याचे असेल तर बेकिंग सोडा तितका प्रभावी होणार नाही. त्याकरिता, आपण आपल्या डेंटिस्ट चा सल्ला घेऊन अधिक चांगल्या व सुरक्षित पद्धतीने दांत सफेद करून घेऊ शकता.

अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: दांत सफेद करून घेण्याचे पांच उपाय ...

sources 

आपल्या सगळ्यांना सेलिब्रिटी सारखे सुंदर स्मितहास्य हवे असते ...

जसे आपण आजारी असतांना आपण स्वत: ला औषध लिहून देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपण आपले मन आणि शरीर यांच्याप्रमाणेच दातांवर देखील आपण स्वतःहून असे उपाय न केलेलेच बरे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दांत काढून झाल्यानंतर या पांच गोष्टी करू नयेत ....

दांत काढल्यानंतर काय खावे व काय खाऊ नये ?

दातांचा इलाज एवढा महाग कसा?