मला इलेक्ट्रिक टूथब्रशची गरज आहे का ?
source |
भारतामध्ये अजून हे काही एवढे प्रसिद्ध झाले नाही आहे पण बहुतेकदा जे लोक या टूथब्रश बद्दल जाणतात त्यांच्या मनात 'इलेकट्रीक टूथब्रश किती प्रभावी असतात ही शंका असते !
source |
आपले दांत स्वच्छ करण्यासाठी खरोखरच आपल्याला इलेक्ट्रिक टूथब्रशची आवश्यकता आहे?
आपल्या नेहमीच्या ब्रश ने दात घासणे आपल्यासाठी पुरेसे नाही का?
आपण सर्व टेकनॉलॉजि म्हटली कि नेहमीच उत्साही होतो ...मग ते 'अलेक्सा , अमुक अमुक गाणं लाव' ते साध्या मशीनवर चपात्या करण्यापासून आपण नेहमीच टेकनॉलॉजिची मदत घेत आलेलो आहोत.
आणि आता दांत स्वच्छ करायला सुद्धा आपला आवडीच्या रंगाचा टूथब्रश सोडून नवीन इलेक्ट्रिक टूथब्रश ?
(तशी मला खात्री आहे माझ्या अगोदर च्या पोस्ट वाचून तुम्ही छान ब्रश करायला लागलाच असाल! 😉)
मित्रहो , इलेक्ट्रिक टूथब्रश ज्याला पॉवर टूथब्रश किंवा स्वयंचलित टूथब्रश देखील म्हणतात, तो मूलतः शारीरिक किंवा मानसिक दुर्बलता असलेले मुले, अपंग अथवा संस्थागत निवास्यांची मौखिक स्वच्छता ठेवायला .. यासारख्या मर्यादीत गतिशीलता असलेल्या लोकांसाठी त्याचा वापर करण्यात येतो.
यावरून आपण या निष्कर्षावर पोहोचतो की स्वयंचलित टूथब्रश खरोखरच आवश्यक नाहीत.
आजकाल भारतीय बाजारपेठेत ओरल बी ते कोलगेट अशा विविध ब्रॅण्ड्सचे विविध प्रकारचे इलेक्ट्रिक टूथब्रश बाजारात आणले जातात जे .4०० ते ६००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
बाजारात उपलब्ध असलेले हे टूथब्रश भरपूर वेगवेगळ्या कार्टून थिम मध्ये येतात ज्यामुळे आपण मुलांमध्ये ब्रश करण्याबाबत उत्साह आणू शकतो तसेच ब्रशिंग अधिक मनोरंजक आणि मजेदार बनवू शकतो.
बरेच संशोधन केल्यावर, मला आढळले की या सामर्थ्यवान टूथब्रशसह काही सामान्य वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. जसे की:
1) एकाधिक क्लीनिंग मोड (ओआरपी तंत्रज्ञान)
ओस्किलेटिंग, रोटेटिंग , पलंसेटिंग (ओआरपी) तंत्रज्ञान आपल्याला दात साफसफाईची ग्वाही देते ज्यामध्ये आपला टूथब्रश वेगवेगळ्या रीतीमध्ये दातांवर फिरतो व वेगवेगळ्या बटणांच्या साहाय्याने आपण त्याचे मोव्हमेन्ट बदलू
२) दोन मिनिटांचा टाइमर
या ब्रश मध्ये बहुत्यादा दोन मिनिटांचा टाइमर दिलेला असतो , जो आपल्याला आठवण करून देतो तेवढा किमान वेळ ब्रश करण्याची!
3) क्वाडपेसर ( quadpacer )
हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये आपल्याला तोंडाच्या डाव्याबाजूकडील दांत साफ करून मग उजाव्या बाजूकडे जाण्याची आठवण करून दिली जाते . ज्यामध्ये इलेक्ट्रिक टूथब्रश आपोआप थांबतो व दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी आठवण करतो.
4) प्रेशर सेन्सर
बहुतेकांना जोरजोरात दांत घासण्याची सवय असते ,ज्यामुळे दातांवरील आवरण घासले जाते किंवा हिरड्यांना इजा होण्याची शक्यता होते , पण इलेक्ट्रिक टूथब्रश मध्ये असे होऊ शकत नाही कारण
या इलेक्ट्रिक टूथब्रशवरील प्रेशर सेन्सर आपल्याला आपल्या दातांवर जास्त प्रेमसुरे फिरवले असता आठवण करून देतात.
निःसंशयपणे, या इलेक्ट्रिक टूथब्रशने दात घासणे नक्कीच आपले जीवन सुलभ करेल. परंतु फ्लॉसिंगसाठी पर्याय नाही जे तितकेच आवश्यक असते.
मॅन्युअल टूथब्रशसह ब्रश करणे देखील तितकेच प्रभावी असू शकते आणि पॉवर टूथब्रशपेक्षा अधिक चांगले ही असू शकते.
तसेच, मॅन्युअल टूथब्रशने चांगले ब्रश करण्यासाठी आपण माझा हा लेख वाचू शकता , ब्रश कसे करावे हे जाणून घ्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा