लहान मूलांना दात येण्याची 10 चिन्हे आणि त्याचे उपाय !
source |
'' दांत येत असणाऱ्या बाळाला पहाणे म्हणजे एखाद्या अणुभट्टीकडे पाहण्यासारखे असते ,ते फक्त पूर्ण विश्रांती घेतलेली माणसेच करू शकतात ''
तुमचे बाळ सतत चिडचिडलेले आणि रडत असण्याचे कारण 'नवीन दांत येणे 'असू शकते!
आपल्या मुलाचे दांत येत आहेत हे आपणास कसे समजेल?
बाळाच्या आयुष्याच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यात दात येणे सुरू होते. बर्याच वेळा बाळांना खरोखरच इतका त्रास होत नाही तर काहीवेळा या प्रक्रियेमुळे चिडचिड होते, ज्यामुळे बाळ रात्रभर झोपत नाही ना ही तुम्हाला झोपू देतं.
दात येण्याची पुढील चिन्हे असू शकतात:
- हिरड्यांना सूज येणे
- भूक न लागणे
- निद्रानाश, अस्वस्थता
- लाळ येण्याचे प्रमाण वाढणे
- वाढलेली तहान
- ताप
- परिस्थितीजन्य पुरळ
- गालाचा लालसरपणा
- उलट्या होणे
- अतिसार
बाळाला दांत येतांना तुम्ही काय काळजी घेऊ शकता ?
प्रत्येक मूल वेगळे असते आणि आपण त्यांना कसे हाताळावे यामध्ये ही फरक पडतो. तुमच्या मुलाला चिडचिड होत असेल किंवा वेदना होत असतील तर दात येताना बाळाला कसे सांभाळावे यासंबंधी आमच्या आवश्यक टिप्स वाचा.source |
प्रतिबंधात्मक उपाय
-आपल्या बाळासाठी शरीराची योग्य स्वच्छता आणि बाळाच्या तोंडाचीही स्वच्छता ठेवणे आवश्यक असते जिथे आपण बाळाच्या हिरड्या स्वच्छ ओल्या कपड्याने पुसाव्यात .
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बाळाला योग्य पोषण दिले जावे.
सामान्य उपाय
दांत येताना तुमच्या बाळाला बहुतांदा कठीण वस्तू चावण्याची इच्छा होत असल्यास त्याला टोस्टसारखा एखादा नरम पण थोडा कठीण पदार्थ चावायला देऊ शकता.
आपण त्याला पेरू किंवा सफरचंद यासारख्या फळांचे तुकडे देखील देऊ शकता जे त्याला त्याची चव ही डेव्हलप करण्यास मदत करतील.
आजकाल दांत येणाऱ्या बालकांना चावण्यासाठी तिथींग रिंग्स किंवा कीज सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
source |
कोणत्याही वैद्यकीय सहाय्यासाठी आपण नेहमीच बालरोगतज्ञ किंवा दंतचिकित्सकांशी संपर्क साधू शकता.
लक्षात ठेवा तुमच्या पाल्याचे ते लहानपणीचे गोंडस स्मित असेच जन्मभर त्याच्यासोबत राहणार आहे!
आणि त्याच्या मौखिक आरोग्याची काळजी घेणे हे आपल्यावर आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा