लहान मूलांना दात येण्याची 10 चिन्हे आणि त्याचे उपाय !
source '' दांत येत असणाऱ्या बाळाला पहाणे म्हणजे एखाद्या अणुभट्टीकडे पाहण्यासारखे असते ,ते फक्त पूर्ण विश्रांती घेतलेली माणसेच करू शकतात '' तुमचे बाळ सतत चिडचिडलेले आणि रडत असण्याचे कारण 'नवीन दांत येणे 'असू शकते! आपल्या मुलाचे दांत येत आहेत हे आपणास कसे समजेल? बाळाच्या आयुष्याच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यात दात येणे सुरू होते. बर्याच वेळा बाळांना खरोखरच इतका त्रास होत नाही तर काहीवेळा या प्रक्रियेमुळे चिडचिड होते, ज्यामुळे बाळ रात्रभर झोपत नाही ना ही तुम्हाला झोपू देतं. दात येण्याची पुढील चिन्हे असू शकतात: हिरड्यांना सूज येणे भूक न लागणे निद्रानाश, अस्वस्थता लाळ येण्याचे प्रमाण वाढणे वाढलेली तहान ताप परिस्थितीजन्य पुरळ गालाचा लालसरपणा उलट्या होणे अतिसार बाळाला दांत येतांना तुम्ही काय काळजी घेऊ शकता ? प्रत्येक मूल वेगळे असते आणि आपण त्यांना कसे हाताळावे यामध्ये ही फरक पडतो. तुमच्या मुलाला चिडचिड होत असेल किंवा वेदना होत असतील तर दात येताना बाळाला कसे स...