तुमची आयुर्वेदिक टूथपेस्ट किती प्रभावी?
source |
आज कालच्या काळात आपला कल आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स वर जास्त आहे.
कोणतीही गोष्ट आयुर्वेदिक किंवा नैसगिक म्हटली की ती वापरण्यास 'सुरक्षित ' किंवा 'केमिकल रहित ' आहे असा आपला समज असतो.
आज बाजारात विविध आयुर्वेदिक टूथपेस्ट मिळत आहेत आणि त्याचा खप नेहमीच्या टूथपेस्ट पेक्षा कमी अधिक आहे.
परंतु, ती गोष्ट मग ती चेहऱ्याला लावायची कोणती क्रीम असो किंवा दातांना साफ करण्यासाठी वापरात येणारी टूथपेस्ट ..एखादे प्रॉडक्ट खरोखरच आयुर्वेदिक आहे कि नाही , किंवा खरोखर ते प्रॉडक्ट त्याला अपेक्षित असलेले काम बरोबर करत आहे कि नाही हे ओळखणं पण तितकच महत्वाचं असत.
बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी ज्याला FDA प्रमाणपत्र मिळालेल असत त्या वापरण्यासाठी सुरक्षित मानल्या जातात . जरी त्यात केमिकल असले तरी आवश्यक ते पदार्थ प्रमाणात असणे आवश्यक असते.
आपल्या सगळ्यांच्याच मनात ही शंका असते कि मी अमुक अमुक कंपनीचं आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरावे, की नुसते सामान्य टूथपेस्ट वापरणे जास्त चांगले?
आयुर्वेदिक टूथपेस्टमध्ये बहुत्यांदा निंब, लवंग तेल, वैविदांग, बकुल, मध, आवळा, डाळिंब, त्रिफळा, अननस, पपई, पुदिना असे अनेक आयुर्वेदिक घटक असतात.
तसेच पारंपारिक टूथपेस्ट काही मूलभूत सामग्रींनी बनलेले आहे जे आपल्या टूथपेस्टला सुसंगतता (CONSISTENCY) आणि पोत (TEXTURE) प्रदान करते ...
एका अभ्यासात हे आढळले आहे की हर्बल टूथपेस्टमध्ये पारंपारिक घटकांसारखेच पोत आणि गुणधर्म आहेत परंतु ते चव आणि रंगात भिन्न असते …
कंझ्युमर रेलशनने केलेल्या अभ्यासामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की आयुर्वेदिक टूथपेस्ट ग्राहकांना पूर्णपणे 'नैसर्गिक' व 'आयुर्वेदिक' असण्याचे आश्वासन देते मात्र त्यामध्ये असणाऱ्या आयुर्वेदिक घटकांचे प्रमाण केवळ 10 टक्के असते आणि बाकीचे घटक पारंपारिक टूथपेस्टप्रमाणेच असतात.
ह्याचा अर्थ बहुतेक आयुर्वेदिक टूथपेस्ट जे आपल्याला दाताच्या किंवा हिरड्यांच्या रोगांना सामोरे जाण्यासाठी चा विश्वास दाखवतात ते बहुतेकदा त्यामध्ये असणाऱ्या फ्ल्युओराइड मुळे अथवा तुम्ही ठेवत असलेल्या दातांच्या सफाई मुळे असते.
पण याचा अर्थ आयुर्वेदिक टूथपेस्ट चांगले नाहीत असे मुळीच म्हणता येणार नाही कारण पारंपरिक टूथपेस्ट मधल्या ज्या घटकांना 'केमिकल ' बोलले जाते ते दातांच्या स्वच्छतेसाठी नक्कीच आवश्यक असतात.
मात्र,आपली दातांची स्वच्छता आपण वापरत असलेल्या टूथपेस्ट किंवा टूथब्रशच्या प्रकारावर काहीच अंशी अवलंबून असते.....
उदाहरणार्थ , आपण आपल्या घराची साफसफाई करताना कशाने सफाई करतो पेक्षा कशी करतो हे जास्त महत्वाचे असते.
मग आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरावे का नाही?
साहजिकच , तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बाजारात मिळणारे आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरू शकता ,
मात्र असे टूथपेस्ट ज्यामध्ये फ्ल्युओरीड आहे व जे FDA द्वारा किंवा FDI (World Dental Federation) द्वारा प्रमाणित आहे तेच वापरावे.
आवश्यकतेनुसार आपण कोणत्या प्रकारचे टूथपेस्ट वापरणे आवश्यक आहे हे आपण आपल्या डेंटिस्टला देखील विचारू शकता.
आपला दंतचिकित्सक बहुधा फ्लूराइड टूथपेस्ट वापरण्याची शिफारस करतात, बहुतेक प्रमाणित भारतीय आयुर्वेदिक टूथपेस्टमध्ये योग्य प्रमाणात फ्लोराईड असते.
आपण आपल्या वस्तू घेताना 'हर्बल' किंवा ',आयुर्वेदिक ' टॅग असलेल्या प्रॉडक्ट्स कडे जास्त लक्ष देतो मग खाद्यपदार्थ नैसर्गीक का घेत नाहीत आणि याचा आपल्या दातांशी कसा संबंध आहे, हे आपण पुढील नवीन लेखात पाहू.
Follow on:
Instagram : quirkyDentist.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा