आपल्या दंत उपचार खर्चासाठी आपण कसे जबाबदार आहात हे जाणून घ्या!

source 

आपल्या दंत उपचाराच्या भरमसाट खर्चासाठी आपणचं  कसे जबाबदार आहात हे जाणून घ्या!
                                                   
वेळेत एक टाके नऊ टाके वाचवते!

खरे आहे ! तुमच्या दातांच्या बाबतीत सुद्धा असेच आहे! या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही तुमच्या दातांच्या ट्रीटमेंट चा खर्च कसा वेळीच आटोक्यात आणू शकता किंवा वाचवू शकता.
त्यापूर्वी आपले दांत कसे किडून खराब होतात हे टप्प्या टप्प्याने पाहू.

आपल्या तोंडातील बॅक्टेरिया वारंवार चरणे , कोल्ड ड्रिंक ,चहा ,कॉफी सारखी घेणे आणि दात नीट स्वच्छ न करणे अशा अनेक कारणांमुळे वाढू शकतात आणि अण्णा दातांमध्ये अडकून राहिले की दाताला कीड लागते.
जेव्हा आपल्या दाताला कीड लागते ती कशाप्रकारे वाढत जाते हे आपण आकृती च्या साहाय्याने पाहू.

१. इनॅमलचे नुकसान


चिन्ह आणि लक्षणे:

  • दातांच्या वेदना होत नाही
  • पृष्ठभागावर सफेद अथवा काळे ठिपके दिसणे . 

उपचार: दातांमध्ये पर्मनंट सिमेंट (कॉम्पोझीट)
किंमत: ५०० ते १५०० रुपये
अँपॉईंट्मेंट वेळा : सिंगल सीटटींग

२. डेंटिनचे नुकसान



चिन्ह आणि लक्षणे:

  • वेदना होत नाही
  • दातांमध्ये अन्नकण अडकणे 
  • किंचित सेन्सिटिव्हिटी


उपचार: दातांमध्ये पर्मनंट सिमेंट (कॉम्पोझीट)
किंमत: ५०० ते १५०० रुपये
अँपॉईंट्मेंट वेळा : सिंगल अथवा डबल सीटटींग

3. पल्प नुकसान



चिन्हे आणि लक्षणे:

  • दातांना सौम्य ते गंभीर वेदना
  • रात्री वेदना अधिक तीव्र होते
  • दातांमध्ये अन्नकण अडकणे 
  • सेन्सिटिव्हिटी चे प्रमाण वाढते 
  • हिरड्यांना सूज येणे  
  • काही कडक पदार्थ खाल्ल्यास वेदना वाढणे 


उपचार: रूट कॅनॉल ट्रीटमेंट (Root Canal Treatment) व कॅप
किंमत: रु.२१०० ते १५०००
अँपॉईंट्मेंट वेळा : एक ते तीन सिटीन्ग्स

४. दाताचा हिरड्यांवरचा भाग किडणे



चिन्हे आणि लक्षणे

  • सौम्य ते गंभीर वेदना
  • दाताचे फ्रॅक्चर 
  • श्वासाची दुर्घंधी
  • दातांमध्ये अन्नकण अडकणे 
  • हिरड्यांना सूज येणे  
  • काही कडक पदार्थ खाल्ल्यास वेदना वाढणे 

उपचार: पोस्ट व कोरसह रूट कॅनॉल ट्रीटमेंट (Root Canal Treatment) आणि कॅप
किंमत: रु.२७०० ते २००००
अँपॉईंट्मेंट वेळा : तीन ते पांच सिटीन्ग्स






5. मुळांपर्यंत कीड लागणे



चिन्हे आणि लक्षणे

  • वेदना असू शकते किंवा असू शकत नाही
  • हिरड्यांना सूज येणे  

उपचार:

  • दांत काढावा लागणे 
  • कृत्रिम दांत बसवणे 

अँपॉईंट्मेंट वेळा : तीन ते पांच सिटीन्ग्स
किंमत: रु. २००० ते ३००००


यासाठी आपण वेळीच आपल्या डेंटिस्ट कडून दातांची तपासणी करून घेणे आणि वेळीच इलाज करून घेणे आवश्यक आहे. आपण केलेला हलगर्जी पण आपल्यालाच कसा महाग पडू शकतो हे आपण आत्ताच पहिले !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दांत काढून झाल्यानंतर या पांच गोष्टी करू नयेत ....

दांत काढल्यानंतर काय खावे व काय खाऊ नये ?

दातांचा इलाज एवढा महाग कसा?