तुमच्या बाळाला दांत येत आहेत ? तर या ५ गोष्टी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे!
source |
नक्कीच पहिल्यांदाच नवीन दांत येणे हा आपल्यासाठी व आपल्या पाल्याच्या आयुष्यातला महत्वाचा पड़ाव असतो!
या वेळी आपल्याला आपल्या पाल्याचे दातांच्या आरोग्यकड़े लक्ष देणे महत्वाचे असते. बहुतांशी पालक मुलाचे दांत किडले किंवा ख़राब दिसु लागले की डेंटिस्ट कड़े घेऊन जातात तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो आणि भरपूर दांत ख़राब झालेले असतात हे कुठे ना कुठे थांबवण्याची गरज आहे.
source |
आपल्या मुलाच्या दंत आरोग्यासाठी आपण पुढील ५ गोष्टींबद्दल जागरूकता पाळणे गरजेचे असते
1. मौखिक आरोग्याबद्दल सल्ला घेणे
'Prevention is better than cure'
'इलाजापेक्षा रोगाचा प्रतिबंध करणे नेहमीच बरे!'
दुधाचे दांत वयाच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यांपासून यायला सुरुवात होते. ज्यावेळी प्राथमिक काळजी घेणे आवश्यक असते आणि हा काळात तुम्ही डेंटिस्टला पहिले भेटू शकता.
source |
२. साखरेच्या दुधासह बाटलीचा वापर करणे टाळावे
तुम्ही कधी लहान मुलांच्या फक्त पुढच्या दातांना कीड लागलेली बघितल आहे का ?
अस्से का होते?
पुढच्या दुधाच्या दातांच्या किडण्याचे मुख्य कारण म्हणजे दुधाच्या बाटलीचा सतत वापर करणे, कधीकधी मूल त्याच्या तोंडात बाटली घेऊन झोपते जे अगदी बरोबर नाही.
बाटलीने दूध पाजून झाले कि तोंडातून बाटली लगेच काढणे आवश्यक असते.
झोपेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी बाळाला शर्करायुक्त पेय देणे हानिकारक आहे कारण झोपेच्या वेळी लाळेचा प्रवाह कमी होतो, यामुळे मुलाच्या दातांवर चवदार द्रवपदार्थ दीर्घकाळापर्यंत रेंगाळतात.ज्यामुळे कीड लागू शकते आणि हेच उपचार न करता सोडल्यास वेदना आणि संसर्गाचा परिणाम होऊ शकतो.
source |
3. दुसरे खाद्यपदार्थ सेवन करू देणे
आपण जे खाता ते आपल्या दंत आरोग्यावर परिणाम करते लहान मुलांच्या दातांचे सुद्धा अगदी तसेच असते .आपण बाळाला वयाच्या आठव्या किव्वा नवव्या महिन्यापासून बाटली किंवा स्तनपान सोडून सॉफ्ट आहार देणे चालू केले पाहिजे अथवा दुधाच्या बाटलीचा वापर कमी करावा.
दुध्याच्या बाटलीनेदूध पाजल्यानंतर बाळाला त्यामध्येच साधे पाणी प्यायला द्यावे.
source |
४. आतून तोंड स्वच्छ करणे
झोपण्यापूर्वी दात व तोंड आतून नीट स्वच्छ कपड्याने पुसून साफ करणे आवश्यक आहे.दिवसातून कमीतकमी दोनदा हे करावे
source |
५. ब्रश ने दात घासणे शिकवण्याची खरी वेळ
टूथब्रश आणि टूथपेस्टशी मुलाचा परिचय वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून करून देणे गरजेचे आहे.या गोष्टींमध्ये आपण स्वतःच ब्रश हातात पकडून आपल्या मुलाला ब्रश करवावे .
आपल्या मुलाला ब्रश कसे करावे हे शिकवण्यापूर्वी आपण स्वतः डेंटिस्ट कडून ब्रश कसे करावे हे शिकून घेणे आवश्यक आहे.
source google.com |
हिरड्या साफ करणारे फिंगर ब्रश विविध साइटवर देखील उपलब्ध आहे जे बाळाचे दांत स्वच्च करण्यास मदत करते.
आपल्या मुलाचे दातांचे आरोग्य हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे , त्यामध्ये माझा मुलगा किंवा मुलगी खूप गोड खातात आणि ऐकतच नाहीत अशी कारणे देणे तुम्हीच विचार करा किती निरर्थक आहे !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा