दीर्घकाळ जगू इच्छिता ? तुमचे दांत स्वच्छ ठेवा !
आपणास माहित आहे का निरोगी हास्य थेट आपल्या आरोग्याशी
आणि दीर्घायुष्याशी संबंधित आहे?
चला पाहूया कसे!
source |
१ .पचनक्रियेमध्ये महत्वाची भूमिका
आपणा सर्वांना ठाऊकच आहे की चांगल्या आरोग्यासाठी पाचनक्रिया योग्य असणे आवश्यक आहे. आपल्या तोंडात पचन प्रक्रिया 'इन्जेशन'(Ingestion)म्हणून सुरू होते, ज्यामध्ये अन्न तोंडात घेतले जाते, नंतर ते चघळले जाते, लाळेतील रसायने देखील अन्नावर रासायनिक प्रक्रिया करण्यास सुरवात करतात. या प्रक्रियेसाठी आपल्या जवळजवळ सर्व दात कार्यक्षमतेने कार्य करणे आवश्यक होऊं बसते. ज्यानंतर अन्न अन्ननलिकेमधून (फूड पाईपमधून) पुढे जाऊ शकते.
जर अन्न नीट चावले गेले नहीं तर आणि आपल्या शरीरास आवश्यक असलेल्या पोषक द्रव्ये आपल्याला पाचनक्रियेद्वारे मिळणार नाहीत ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकेल.
तरीही खात्री पटली नाही का ?? ठीक आहे ,आपण आपल्या आजोबांना विचारा ते दाताशिवाय नुसत्या कवळीने कसे खाऊ शकत आहेत !🙆
source |
२. छान दिसणे सुद्धा महत्वाचे !
सौंदर्य पाहणारयाच्या नजरेत आहे!
खरे आहे हो पण ! चांगले दात केवळ चांगल्या आरोग्यासाठीच न्हवे तर एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याचा सुद्धा भाग असते. सूंदर व निरोगी स्मितहास्य आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी कारणीभूत असते.
या गोष्टीचा थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही परंतु अर्थातच त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर आणि एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन सामाजिक जीवनावर परिणाम करू शकतो.
source |
3. आपले आयुष्य वाढवते
संशोधन असे दर्शविते की वयाच्या ७४ व्या वर्षी ज्यांचे सर्व दांत आहेत ते वयाच्या १०० व्या वर्षा पयन्त जगण्याची शक्यता जास्त असते.
source |
आतापर्यंत हे स्पष्ट झाले आहे की दाताची मजबूती आपल्याला आपले संपूर्ण आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करते , आणि हो फक्त आपल्या आवडीचे गुलबजाम खाऊन नाही तर गाजर किंवा काकडी खाऊनच बर का !?😆
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा