तोंडाची दुर्गंधी सोडविण्यासाठी 6 गोष्टी!
SOURCE |
किंवा आपणच त्या तोंडाच्या दुर्गंधीबद्दल तक्रार करता का ?
तुम्हीसुद्धा तुमच्या तोंडाच्या दुर्गंधीबद्दल कंटाळले आहेत का ?
SOURCE |
तोंडाची दुर्गंधी पासून सुटका मिळवण्यासाठी पुढील गोष्टी अमलात आणू शकता !
१. पुरेसे पाणी प्या !
source |
'Keep quiet and drink water!'
कोरडे तोंड दुर्गंधीचे मुख्य कारण असते. बहुतेकदा दीर्घकाळ प्रवास करून ,खूप काळ झोपून किंवा भरपूर वेळ काही ना खाता राहण्यामुळे तोंड कोरडे पडून तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.
यातुन बाहेर निघण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या कामाच्या जागी किंवा पलंगापाशी पाण्याची बाटली ठेऊन एक एका तासाने पाणी पीत राहिले पाहिजे.
२. ब्रश आणि फ्लॉस व्यवस्थित करा
source |
छान मुखवासासाठी चांगले दात स्वच्छ ठेवणे ही तितकेच महत्वाचे आहे यात काही शंकाच नाही.
दातादरम्यान अडकलेल्या अन्न कणांपासून मुक्त होण्यासाठी विशेषतः फ्लोसिंग महत्वाचे आहे.
दिवसातून दोनदा अँटीबैक्टीरियल माउथवॉशने आपले तोंड स्वच्छ धुवा.
घरातील जी वयस्कर माणसे कवळ्या वापरतात त्यांनी त्यांच्या कवळ्या साबणाच्या पाण्यामध्ये स्वच्च धुवाव्यात किव्वा घासून काढाव्यात.
चेक करा : ब्रश कसे करावे हे जाणून घ्या!
३. तुम्ही काय खाता याकडे ही लक्ष द्या
source |
आपण कुणाला भेटायला बाहेर जाण्यापूर्वी मसालेदार पदार्थ किंवा लसूण असलेली कोणतीही गोष्ट खाणार नाही ना याची काळजी घ्या. ज्या प्रमाणे काही खाद्यपदार्थ तुमचा श्वास खराब करण्यासाठी कारणीभूत असतात त्याचप्रमाणे काही पदार्थ तुच्या स्वच्छ श्वासासाठी ही कारणीभूत असू शकतात.
लसूण, कांदा, दुधाचे पदार्थ, कॅफीनयुक्त पेय जसे चहा -कॉफी यासारखे पदार्थ श्वासाची दुर्गंधी वाढवतात. त्याऐवजी कच्ची फळे किंवा पालेभाज्या ,गाजर आणि काकडी खा जे दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात.
काहीच नाही तर साधा पुदिना च किव्वा तुळशीचं पान चावून खाऊ शकता जे दुर्गंधी कमी करायला हमखास मदद करेल.
४. जीभ स्वच्छ ठेवा
source |
आपल्यातील बर्याच जणांना हे माहित नाही की तोंडातील जीवाणूंसाठी भेटण्याची आवडती जागा म्हणजे आपल्या जिभेच्या सर्वात मागची घशाकडील बाजू होय.
जिभेच्या त्वचेच्या पातळ थरात बॅक्टेरिया आणि अन्न कण अडकून राहतात. तुम्हाला जीभ स्वच्छ करायची असेल तर सहज तुमच्या साध्या टूथब्रश ने जिभेच्या मागच्या भागावर हळुवारपणे ब्रश फिरवा आणि बाहेर च्या दिशेने फिरवा. सर्व झाले कि पाण्याने चूळ भरून घ्या.
५. सुगरफ्री चुईंग गम चा वापर
source |
पेपरमिंट टॅब्लेट केवळ तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करू शकते. शुगर फ्री चुईंग गम हे कोरड्या तोंडामध्ये लाळीचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करते.
६. तुमच्या डेंटिस्ट कडून दातांची सफाई (ORAL PROPHYLAXIS) करून घ्या
source |
आपल्या दंतचिकित्सक वर्षातून कमीतकमी दोनदा नियमितपणे भेट द्या . तुमचा दंतचिकित्सक तुम्हाला तपासून दातांमध्ये किंवा तुमच्या हिरड्यांमध्ये काही समस्या असतील तर सांगू शकेल व त्यावर वेळीच उपचार करतील.
source |
फक्त या सहा गोष्टी पाळा आणि जगाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी तयार व्हा !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा