दात सफेद करण्यासाठी खरोखर बेकिंग सोडा वापरू शकतो ?
sources आपण दांत सफेद करण्यासाठी खरंच किती नवीन नवीन गोष्टी वापरून बघतो, नाही का..? कधी ऑइल पुल्लिंग कधी व्हाईटनिंग टूथपेस्ट , कधी व्हिनेगर आणि इंटरनेट वर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तो बेकिंग सोडा ! सगळ्यात पहिल्यांदा दांत सफेद करण्यासाठी सांगितले जाणाऱ्या पर्यायांमध्ये बेकिंग सोडा किंवा मीठ हे पदार्थ असतातचं ! काय आहे हा बेकिंग सोडा आणि खरोखरच ह्याने आपले दांत सफेद होतात का ... चला पाहू... बेकिंग सोडा म्हणजे काय? बेकिंग सोडा कुठे वापरला जातो हे तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे ... बेकिंग सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेट हे एक रासायनिक कंपाऊंड असते जे पांढरे, स्फटिकासारखे असते आणि बर्याचदा बारीक पावडर स्वरूपात असते . हे सोडियम आणि बायकार्बोनेट आयनपासून बनलेले असते. . हे स्वभावात अल्कधर्मी असते म्हणूनच ते आपल्या तोंडातील आम्लीय वातावरण निष्प्रभावी करण्यास मदत करते. हे खरोखर माझे दात पांढरे करू शकते? source बेकिंग सोडा एक सौम्य अपघर्षक पदार्थ (abrasive agent) आहे, तो आपल्या दातांच्या पृष्ठभागावरील डाग काढून टाकते. हे केवळ प्लाक, चहा किंवा कॉफीचे डाग